दुकानातून खाऊ घेऊन देतो म्हणत, नराधमाने 6 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार

Published on -

सातारा – खाऊचे आमिष दाखवून एका सहा वर्षांच्या मुलीवर नराधम तरुणाने बलात्कार केल्याची घटना सातारा शहरात घडली. 

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सलम्या मंडे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, पीडित मुलगी दिवाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आली आहे.याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. सलम्या याने किराणा दुकानातून खाऊ देतो, असे मुलीला सांगितले. 

त्यानंतर त्याने मुलीला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलीने झालेल्या घटनेची माहिती पालकांना दिली. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe