‘त्या’ योजनेतून बाळासाहेब ठाकरेंचे नाव कुणी वगळले?

Published on -

श्रीरामपूर :- एसटी महामंडळाने बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने अपघात सहाय्यता निधी योजना सुुरू केली.

मात्र, विश्वस्त संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करताना वेगळ्या नावाने नोंदणी केली. नाव कसे व कोणी बदलले याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी केली.

पत्रकात म्हटले आहे, १ एप्रिल २०१६ पासून अपघात घडल्यास मृताच्या वारसांना १० लाख भरपाई देण्यासाठी ही योजना सुरू झाली. प्रवाशांकडून तिकिटाविरहीत १ रुपया शुल्क आकारण्यास सुरुवात झाली.

जमा होणारी रक्कम विश्वस्त संस्थेत जमा व्हावी या उद्देशाने सरकारने परवानगी देऊन २७ नोव्हेंबर २०१८ ला विश्वस्त संस्थेसंदर्भात प्रस्ताव दाखल करून बृहन्मुंबई विभाग सहायक धर्मादाय आयुक्तांनी वरिष्ठ अधिकारी एम. एन. काळे यांना प्रस्ताव मंजूर करून प्रमाणपत्र दिले.

महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन अॅक्सिडेंट रिलीफ फंड नावाने नवीन विश्वस्त मंडळ स्थापन झाले. व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची अध्यक्षपदी निवड होऊन ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मंडळ करण्यात आले. संस्थेस ठाकरे यांचे नाव दिले गेले नसल्याचे उघडकीस आल्याने चौकशीची मागणी श्रीगोड यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe