मुलाला फाशी देत आईची छताला गळफास घेऊन आत्महत्या !

Published on -
नांदगाव : दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईनेही घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील मणिकपुंज येथे घडली. गोरख तुकाराम मेंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजुरी करून उदरनिर्वाह करणारे गोरख आणि राहीबाई त्यांचा दीड वर्षाचा मुलगा संदीप, भाऊ शरद आणि त्याची पत्नी मंगलाबाई एकत्र मणिकपुंज येथे राहतात.
मंगळवारी सायंकाळी कामावरून परतल्यावर घराचा दरवाजा आतून लावलेला असल्याने मेंगाळ कुटुंबातील सदस्य कौल उचकटून आत डोकावले असता त्यांना संदीप आणि राहीबाई यांचे गळफास लावलेले मृतदेह छताला लटकल्याचे आढळून आले.
याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आईने मुलाला ठार करून आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करत आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe