यंदा लग्नाचे मुहूर्त कमी, जाणून घ्या यंदाच्या वर्षातील विवाहाचे मुहूर्त …

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : दिवाळीत तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त काढण्याची आजही परंपरा कामय आहे. त्यामुळे इच्छूक वधू-वरांना लग्न मुहूर्ताची घाई असते. मात्र, यंदा विवाह मुहूर्त कमी आहेत.

यावर्षी विवाह मुहूर्त कमी असल्याने इच्छूक जोडप्यांना तसेच विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे. 

कारण मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठिण होऊ बसले आहेत. अनेक ठिकाणी विवाह हॉल आधीच बुक झालेत. त्यामुळे अनेकांना हॉल बुक करणे अवघड होत आहे.

या वर्षी विवाहमुहूर्त कमी असल्याने विवाहेच्छुकांना व विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे. यावर्षी शुभ विवाहासाठी अवघे 46 शुभमुहूर्त असल्याने वधू-वरपित्यांची मुहूर्त शोधण्यासाठी चांगलीच धावपळ होणार आहे

यामुळे उपवर वधू-वर पित्यांची सध्या लग्न जुळवाजुळव करण्यापासून ते लग्नमुहूर्त साधण्यासाठी तारांबळ उडत आहे. 

विवाहासाठी शुभ मुहूर्ताच्या तारखा

सन 2019 नोव्हेंबर 20, 21, 23, 28, डिसेंबर महिन्यात 1, 2, 3, 6, 8, 11, 12 यानंतर गुरू अस्त असल्याने सन 2020 च्या जानेवारी महिन्यात 18,20,29, 30, 31, फेब्रुवारी महिन्यात 1, 4, 12, 14, 16, 20, 19, मार्च महिन्यात 3, 4, 8, 11, 12, 19, एप्रिल महिन्यात 15, 16, 26, 27, मे महिन्यात 2, 5, 6, 8, 12, 14, 17, 18, 19, 24, जून महिन्यात 11, 14, 15 असे विवाहासाठी एकूण 46 शुभमुहूर्त आहेत.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment