नळदुर्ग तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी गावचे सुपुत्र भारतीय लष्कर दलात मेजर सतीश नागनाथ बाबर (२२) यांचा पुणे येथे कर्तव्य बजावताना बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (दि.७) सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या मूळगावी गुळहळ्ळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबर हे पुणे येथे कर्तव्य बजावत असताना बुधवारी दुपारी अंगावर वीज कोसळल्याने शहिद झाले.
पुणे येथून दुपारी त्यांचा मूळगावी गुळहळळी येथे पार्थिव आणण्यात आले. सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाबर हे अठराव्या वर्षी सैन्यदलात रूजू झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.