मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात तेरा वर्षीय मुलीवर स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार !

Published on -

नागपूर :- तेरावर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर गावाजवळील स्मशानभूमीत चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात उघडकीस आली.

या घटनेनंतर गावात संतापाची लाट पसरली असून या घटनेतील दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले आहेत. याप्रकरणी अमित ठाकूर (१८), बलवंत गोंड (२२) यांच्यासह दाेन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर बलवंत गोंड फरार आहे.

रविवारी रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परतत असताना गावातील चाैघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले व तिला गावात आणून सोडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe