राहुरी ;- केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या निषेधार्थ शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून नगर-मनमाड मार्ग अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
निर्यातबंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवडक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून रास्ता रोको आंदोलन छेडले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा रवि मोरे, प्रकाश देठे यांच्यासह इतर सात जणांवर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार डी. बी. जाधव करत आहेत.