अकोले – अकोले ‘ऊसतोड मुकादमाचे काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या श्रमातून व कृतीतून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. लोकहिताची कामे करत सामाजिक कार्यातून सीताराम गायकर मोठे झाले.
त्यांच्याबद्दल धोतर फेडण्याची भाषा वापरणे अशोभनीय आहे. चुकीचे बोलणे हाच त्यांचा धंदा आहे,’ अशी टीका माजी मंत्री मधुकर पिचड यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली.

आदिवासी भागातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा राजूर येथे आयोजित करण्यात आला होता. पिचड म्हणाले, ‘विरोधक आम्हाला केवळ शिव्या देण्याचे काम करीत आहेत. ते जेवढ्या शिव्या देतील तेवढे मतदान वाढेल. याची मला खात्री आहे. सीताराम गायकर यांचे धोतर फेडू म्हणणाऱ्यांचा बदला जनता घेईल.