मुंबई : काहीही होवो, पण यावेळी राज्यात भाजपाचे सरकार नको आहे, अशी युवक, शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजात तीव्र भावना मला दिसत आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
तसेच कधीकाळी आपल्यासोबत असलेला समाजातील वंचित घटक पुन्हा आपल्याकडे कसा वळेल हे पाहायला हवे.
यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत केले.. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची रविवारी प्रदेश कार्यालयात बैठक असून यात पराभूत उमेदवारांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, नवनिर्वाचित सातारचे खासदार श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित होते.