कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Published on -

पुणे : कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी (टाकळी हाजी, ता. शिरूर) येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज उचलले होते. परंतु, गेल्या वर्षी दुष्काळाची दाहकता होती. त्यामुळे त्यांचे उसाचे पीक जळून खाक झाले होते.

या वर्षीही अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले होते. त्यामुळे त्यांना मोठे नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्यांनी शनिवारी (दि.२) विषप्राशन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe