राहुरी : आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम गेली काही दिवस करत होते.मात्र विखे कर्डिले समीकरण तोडण्याचे षडयंत्र आम्ही सामूहिकपणे हाणून पाडले.आमच्या दोन्ही कुटुंबांमधील वैचारिकता कायम राहणार आहे, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.
राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत बोलतांना खा.विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधला . ईडीच्या नावाखाली सहानूभूती मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी लक्ष्य केले.
पाटबंधारे खात्यात वीस हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यांना मोकळे सोडायचे का? अशा शब्दात गैरसमज पसरवणाऱ्यांचे देखील खा. विखे यांनी कान उपटले. यावेळी आ कर्डिले यांनी देखील आपल्या अस्सल शैलीत भाषण केले .. म्हणाले, स्व.मुंढे यांच्यामुळे या मतदारसंघात काम करण्याची संधी मला मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, खा.विखे यांच्या माध्यमातुन जनतेच्या सुख दुखात सहभागी आहे असेही ते म्हणाले .