कोपरगाव : केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्यातही भाजप सरकारला साथ द्या. पाणी, रस्ते, पथदिवे यांसह विविध नागरी सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
ज्यांनी दहा वर्षांत विकास केला नाही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तालुक्यातील अंजनापूर, रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, बहादरपूर, शहापूर, पोहेगाव व सोनेवाडी या भागात कार्यकर्त्यांसमवेत बैठकीत केले.

आ. कोल्हे म्हणाल्या, सलग दहा वर्षांची सत्ता देऊनही ज्यांना मतदार संघाच्या विकासासाठी काही करता आले नाही. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात युती शासनाने विकासाचा धडाका लावला असून, कुणाच्या संभ्रमीत सांगण्यावरून तुम्ही चुकीचे बटन दाबाल, तर पश्चातापाची पाळी येईल. तेव्हा त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
मोदी सरकार ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय घेणारे आहे. पाच वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा सांगितला. सामाजिक सभागृह, रांजणगाव देशमुख ते कोऱ्हाळे रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय, ओझर विमानतळ रस्ता रा.मा. ३५ बहादरपूर ते वेस रस्ता, पंचकेश्वर कॅनॉलवरील पूल, समाज मंदिर आदी परिसरातील पाच वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा त्यांनी सांगितला.. प्रारंभी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी, संचालक उपस्थित होते. आमदार कोल्हे म्हणाल्या, निळवंडे धरण जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी असून, त्याचे कालवे पूर्ण करून प्रभावीपणे सिंचन सुविधा, कोपरगाव शहरवासियांना थेट बंद पाईपलाईनमधून पाणीपुरवठा, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे प्रलंबित प्रश्न आणि मतदार संघातील ८९ गावांचा आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा आपल्याकडे तयार असून, त्यावर रात्रंदिवस काम सुरू आहे.
केंद्रातील मोदी सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाला गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी देवून अनेक कामे मार्गी लावली आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनासाठीही मोठा निधी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत ९ हजार ९३९ शेतकऱ्यांना ३५ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
मागील दहा वर्षात विकासाचा एक खडाही अनेकांना पहावयास मिळाला नाही आणि आता तीच मंडळी अपप्रचार करीत आहे. कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आगामी पाच वर्षात आणखी गतिमानता त्यात आणू, असेही त्या शेवटी म्हणाल्या.