जीवघेण्या खड्ड्यांनी उदध्वस्त केली स्वप्न, दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर असणाऱ्या तरुणीचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

भिवंडी :- लग्नाची स्वप्न रंगवणाऱ्या आणि लोकांना जीवदान देणाऱ्या डॉ. तरुणीवरच काळानं घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांनी डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची आयुष्य़ाची स्वप्न उद्ध्वस्त केली. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे तरुणीचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

भिवंडीत वाडा रोडवर दुगाड फाट्याजवळ दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर असणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉ.नेहा आलमगिर शेख असं या 23 वर्षीय तरुणीचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री अनगाव येथील टोल नाका बंद केला आहे.

नेहाचं पुढच्या महिन्यात लग्न होतं. लग्नाची अनेक स्वप्न रंगवली होती. नव्या जीवनाची सुरुवात नव्या अशा आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नेहाबाबत मात्र काळानं घात केला. बोहल्यावर चढण्याआधीच नेहाचा खड्ड्यांमुळे भीषण अपघात झाला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ.नेहा शेखचा कसा झाला अपघात लग्नाची खरेदी झाल्यानंतर नेहा ठाण्याहून भिवंडीला निघाली होती. दरम्यान त्याच वेळी दुचाकी अचानक खड्ड्यात आदळल्यानं आणि नेहाचा तोल गेला. तिला सावरण्याचा एक क्षणही मिळाला नाही आणि ती खाली पडली. याच वेळी मागून येत असलेल्या भरधाव ट्रकचं चाक नेहाच्या अंगावरून गेल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment