अहमदनगर : सत्तेच्या काळात पवारांना जनतेच्या डोळ्यातील अश्रु दिसत नव्हते परंतू आता पाच वर्षे विरोधात राहिल्यानंतर त्यांना अश्रु फुटत आहे. पण हा नादानपणा आहे.
अशी परखड टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केली. धरण कोरडे पडल्याची व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला ते काय म्हणाले हे जनता विसरली नाही. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
नगर येथे महायुतीचे उमेदवार अनिलभैय्या राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर टिका केली.ते म्हणाले भावना सर्वांंना असतात, दगडालाही पाझर फुटतो,तसे पवारांनाही अश्रु फुटले. ते तुमच्या दु:खामुळे नाही तर सत्ता गेल्यामुळे.शेतकरी, कष्टकरी यांच्या व्यथा घेवून शिवसेना मोर्चे काढत होती. तेव्हा हे सत्तेत धुंद होते.
त्यांना जनतेचे अश्रु दिसत नव्हते.शिवसेना कायम जनतेच्या सोबत असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच असे त्यांनी वचन दिले. राममंदिराबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात उद्योग मंदिरे उभी रहावीत.हा अजेंडा आहे.सर्वसामान्यांना दहा रुपयात जेवणाची थाळी व एक रुपयात आरोग्य तपासणी,वीज बीलात कपात,युवकांना रोजगार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
नगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच व तो अभेद्य राहणार.नगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही,येथील गुंडगिरी कायमची मोडून काढू असे ते म्हणाले.