श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे राजकीय वातावरण तापत चालले असून येत्या दोन – तीन दिवसानंतर श्रीरामपुरात राजकीय भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे.
ससाणे गटाने ना. विखे यांची साथ सोडून थोरातांचा हात हातात घेवून काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. मात्र ससाणे गटात मोठ्या प्रमाणावर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारे बहतेक मोठे कार्यकर्ते आहेत.
अजून हे सर्व कार्यकर्ते ससाणेबरोबर आहेत. शिवाय आदिकांना मानणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक हे ना. विखेंच्या संपर्कात आहेत.
अजून कोणीही उघडपणे भूमिका घेतली नसली तरी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच येत्या दोन तीन दिवसानंतर श्रीरामपुरात प्रमुख कार्यकर्त्यांना उघड भूमिका घ्यावी लागणार आहे . त्यामुळे या आठवड्याभरात श्रीरामपूरच्या राजकारणात अनेक छोटे – मोठे राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे.