नगर – महापौर असताना राज्य सरकारकडून सिना नदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर करुन आणला. परंतु विरोधी उमेदवारांनी सुशोभिकरणाचा हा प्रकल्प बंद करण्याचे काम केले. त्यामुळे तो निधी परत शासनाकडे वर्ग झाला.
तपोवन रोडसाठी शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर त्यांनी हाही रस्ता बंद पाडण्याचे काम केले. शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम मी करीत असतांना त्यांनी मात्र प्रत्येक विकासकामांत खोडा घालण्याचे पाप केले, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला.

प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, विनित पाऊलबुधे, संपत बारस्कर, बाळासाहेब भुजबळ आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. वारे म्हणाले, आमच्यासारख्या तरुणांना समाजकार्यात आणून समाजाचे प्रश्न सोडवून घेतले.
तीन वेळा नगरसेवक केले. विकासकामे करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम केले. यांची नगरसेवक व्हायची पात्रता नाही, त्याला आ. जगताप यांनी महापौर केले. आमदारांमुळे आशा व्यक्तीच्या पाठिमागे उभे राहिलो.