परिचारिका दिनानिमित्त आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी परिचारिकांच्या कामाचे केले कौतुक

Ahmednagarlive24
Published:

सांगली : जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या

कोरोना रुग्णालयास भेट व आढावा घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रुग्णालयातील परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सारे जग संघर्ष करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घटक रात्रंदिवस काम करीत आहेत. यामध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.

कोरोना विरुद्धच्या या लढाईत परिचारिका आघाडीवर राहून आपल्या जीवाची पर्वा न करता श्रम करीत आहेत ही बाब अतिशय कौतुकाची आहे असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.

देशभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापुढच्या काळात सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. स्वयंशिस्त पाळत सेल्फ डिस्टन्सिंग ठेवताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे गरजेचे आहे.

आरोग्य विभाग, पोलीस दलामधील अधिकारी व कर्मचारी, महसूल विभाग व स्वच्छता विभागातील कर्मचारी कोरोना विरुद्धच्या या रणसंग्रामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करत असलेल्या सर्व घटकांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अधिष्ठाता डॉक्टर नणंदकर, डॉ.दीक्षित, वंदना शहाणे, सारिका गव्हाळी, प्रिया राहुल, आशिष ओंबासे, शेखर साठे डॉक्टर रुपेश शिंदे राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खरमाटे,

डॉ. पी डी गुरव, वंदना शहाणे, सुरेखा माने, सुनीता ढगे, सारिका घवाळी, प्रिया राऊळ, वरून सत्याचारी, आशिष ओमासे, शेखर साठे, विशाल शेवटे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी, परिचारक-परिचारिका उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment