अहमदनगर : –
अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली.
यावेळी त्यांनी मधुकर पिचडांवर जहरी टिका नाव न घेता केली. म्हणाले, अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय?, असा सवाल पवार यांनी यावेळी केला.

पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही हातवारे करत टीका केली. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची असं म्हणत त्यांनी पुन्हा हातवारे केले.
समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का? असा सवालही त्यांनी केला.