अ.नगर शहर-जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ मयूर पाटोळे यांच्या गळ्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पद हे लोकसभा निवडणुकी पासूनच रिक्त होते खासदार डॉ. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशा नंतर युवक काँग्रेसच्या जिल्हा निरिक्षकानी संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली होती. 

यापूर्वी अहमदनगर युवक काँग्रेसच्या शहरजिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक निखिल वारे हे होते जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याने त्यांचेही पद बरखास्त झाले , त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मयूर पाटोळे यांची अध्यक्ष पदी निवड केली आहे. 

मयूर पाटोळे हे सत्यजित तांबे व बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत विश्वासू व निकट मानले जातात, गेल्या ३ वर्षात अनेक आक्रमक आंदोलने नव-नवीन उपक्रम, पक्षाने दिलेल्या जबाबदारी त्यानी पार पडल्या आहेत , मागील महानगरपालिका निवडणुकीत सत्यजित तांबे यांची जाहीर सभा घेऊन जय्यत तयारी दाखवत, शिवसेना नगरसेवक अशोक बडे यांच्या विरोधात दंड थोपटले होते.

परंतू काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी झाली व ही जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे त्यांनी आघाडीचा धर्म पाळला, पक्षाच्या अडचणीच्या काळात युवक काँग्रेसचे काम ते अतिशय कष्टाने करतील असा विश्वास काँग्रेसचे शहरजिल्हा अध्यक्ष दिप चव्हाण व इतर पदाधिकाऱ्यांन मध्ये देखील दिसून येतो म्हणून त्यांच्या नावाला सर्वांनी संमती दिली व अध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली आहे. 

मयूर पाटोळे – पक्ष अतिशय खडतर परिस्थितीत जात आहे परंतु आश्या परस्थितीमध्ये सत्यजित दादा तांबे यांनी माझ्या वर विश्वास दाखवला व शहर अध्यक्ष दिपजी चव्हाण व सर्व पदाधिकाऱ्यांनी संमती दिली त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानतो येणाऱ्या काळात सर्वाना सोबत घेऊन मी सक्रिय पणे काम करेल व काँग्रेसचा विचार घराघरात घेऊन जाईल व नगर शहरातील तरुणांच्या अडचणींचा बुलंद आवाज आम्ही बनू व प्रामाणिक पणे पक्ष संघटना वाढवू व सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन तरुणांना युवक काँग्रेस मध्ये संधी देऊ .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment