आमदारांबाबत पोस्टवरून तरुणावर तलवारीने हल्ला !

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या विरोधी गटातील युवकावर तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री सोनईजवळील शिंगवे तुकाई येथे घडली. युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोमवारी सायंकाळपर्यंत कोणतीही फिर्याद दाखल झालेली नव्हती. ओंकार अरुण होंडे (४०, शिंगवे तुकाई) हा पांढरीपूल एमआयडीसीत नोकरीस आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गावातील कार्यक्रमासाठी तो गेला होता. आजी-माजी आमदारांच्या गटातील कार्यकर्ते तेथे जमले होेते. 

ओंकार आमदारांबाबत पोस्ट टाकतो व त्यांचा प्रचार करतो, या कारणावरुन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यास बेदम मारहाण केली. एकाने तलवारीचा घाव डोक्यात घातला. 
आरडाओरडा झाल्यावर हल्लेखोर पळून गेले. काहींनी जखमीला शनिशिंगणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment