पाथर्डी –
निवडणूक लागली की, विरोधक जागे होतात. साडेचार वर्षांत कुठे संपर्क नाही, येणे-जाणे नाही, कोणाकडून उभे रहायचे याचा काही अंदाज नाही. भाजप, सेना, मनसे, वंचित अशा सर्वत्र चकरा मारल्या.
परळी, पुण्या-मुंबईला चकरा मारल्या. ‘घड्याळ’ कोणी बांधत नव्हते, म्हणून उमेदवारी गळ्यात मारली, असे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता टीका केली.
खरवंडी कासार येथील सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पांडुरंग खेडकर होते. सुभाष अंदुरे, अंकुश कासुळे, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, अरुण मुंडे, माणिक खेडकर, सुभाष केकाण, नामदेव लबडे, काशीबाई गोल्हार, महादेव जायभाय, श्रीकांत मिसाळ, डॉ. ज्ञानेश्वर दराडे या वेळी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, वातावरण तापवून समाजात विष कालवण्याचे काम काही मंडळी करत आहेत. राज्यात राष्ट्रवादीची काय अवस्था आहे, याचा विचार त्या पक्षाला मत देताना करावा.