कांद्याला मिळाला ‘३९०५’ भाव

Published on -

नाशिक : गेल्या आठवड्याभरापासून कांदा बाजारभाव वधारला असून, बुधवारी (दि.१८) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याने ३९०५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळवून उच्चांक गाठला आहे. 

कमीत-कमी २ हजार रुपये भाव मिळाला, तर कांद्याने सरासरी ३५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव गाठल्याने कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली असून, पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी (दि.१८) उन्हाळ कांद्यास जास्तीत जास्त ३९०५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. बाजार समितीत दिवसभरात १२७८० क्विंटल कांद्याची आवक झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!