ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर : राजळे

Ahmednagarlive24
Published:

शेवगाव –  गेल्या पाच वर्षांत जनहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर न बोललेले, तसेच लोकांच्या सुख-दु:खात सामील न झालेले आज जात-पात व भावनेचा विषय काढून दिशाभूल करत आहेत. ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवत आहोत, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. 

भाजपच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी जनता व्यासपीठावर झाली. सभेपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचारफेरी काढण्यात आली. आमदार राजळे म्हणाल्या, मी सर्वच कार्यकर्त्यांना मान-सन्मान देण्याचा प्रयत्न केला, कुणातही भांडणे लावली नाहीत. 

आमदार म्हणून काम करताना नवीन असल्यामुळे कळत-नकळत काही चुका झाल्या असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. 

या वेळी रामनाथ राजपुरे, अरुण मुंडे, अशोक आहुजा, अविनाश मगरे, सुनील रासने, शब्बीर शेख, आत्माराम कुंडकर, नितीन काकडे यांची भाषणे झाली. या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment