जामखेड : शेतात शेळ्या चारत असताना खाली पडलेल्या पोलच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे अशोक शिवाजी पुढाईत (वय २५ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आघी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जामखेड तालुक्यातील आघी या ठिकाणी रविवार दि.२० रोजी अशोक शिवाजी पुढाईत हा तरुण शेळ्या चारण्यासाठी घेवून गेला होता. सध्या पावसाळा असल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
त्यामुळे आघी परिसरात आनेक ठिकाणी लाईटचे पोल पडले आहेत. त्यामुळे वाजेच्या तारा देखील जमिनीला चिकटल्या आहेत. अशोक हा दुपारी राजेंद्र वासुदेव होशिंग यांच्या शेतातील बांधावर शेळ्या चारत आसताना गवतामध्ये लाईटच्या पोलच्या तारा पडलेल्या होत्या या तारांमध्ये विद्युतप्रवाह होता.
मात्र गवतामुळे अशोक यास तारा दिसल्या नसल्याने व खाली पावसामुळे ओलसरपणा असल्याने याचा धक्का लागुन अशोकचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गावातील दादासाहेब बाबुराव घुले यांनी दिलेल्या खबरीवरुन जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विठ्ठल चव्हाण, संदीप क्षीरसागर हे करत आहेत.