ईव्हीएम हॅकिंग, मोबाइल जॅमरची मागणी फेटाळली

Ahmednagarlive24
Published:

मुंबई – 
काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम हॅकिंग करता येऊ नये यासाठी स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर लावण्याची मागणी केली आहे. मात्र ईव्हीएम यंत्रे फूलप्रूफ असल्याचे सिद्ध झाले आहे. या यंत्रांना बाह्य संपर्क यंत्रणेद्वारे हाताळता येऊ शकत नाही. 

त्यामुळे मतमोजणी केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेले पोलिस अधिकारी बापू पांडू गावडे (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

कोल्हापूरमध्ये निवडणुकीच्या कामावर नियुक्त असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या कामावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर नुकसान भरपाई दिली जाते. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, असे सिंह यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment