मतदान कक्षात सेल्फी काढणे आले अंगलट

Ahmednagarlive24
Published:

नाशिक : शहर आणि जिल्ह्यातील उत्साही मतदारांना मतदान कक्षात सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले असून, सात सेल्फी बहाद्दरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 

नागरिकांनी सेल्फीचा मोह टाळावा तसेच मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेले असून, सेल्फी काढण्याचा मोह हा एक गुन्हा ठरला आहे. संबंधितांविरोधात रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. 

निवडणुकीतील गोपनीय मतदानाचे चित्रीकरण होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान कक्षात मोबाइल नेण्यास बंदी घातली आहे. याबाबत प्रत्येक मतदान केंद्रावर नेमलेले अधिकारी व कर्मचारी मतदारांना मोबाइल फोन न वापरण्याबाबत सूचना देत होते, तरीदेखील नाशिकच्या चारही म्हणजे पूर्व, पश्चिम, मध्य आणि देवळाली मतदारसंघांत तसेच जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, येवला आणि निफाड येथे सेल्फी बहाद्दर आढळले. 
संबंधितांनी सोशल मीडियावर फोटो प्रसारित करण्यासाठी स्वत:च्या मोबाइलमध्ये मतदान करताना आणि ईव्हीएमचे बटन दाबताना फोटो काढले. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना रोखत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, संबंधितांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment