बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने वडिलांची आत्महत्या, जमावाकडून पोलिसांना मारहाण

Ahmednagarlive24
Published:

मुंबई –
कुर्ल्यातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले. काही दिवसांपासून पंचाराम रिठाडिया यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. 

मुलीचा शोध लागत नसल्याने रिठाडिया यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कुर्ला येथील ठक्कर बाप्पा परिसरात राहणाऱ्या पंचाराम रिठाडिया यांची मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. 

अंत्ययात्रा सुरु झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला. या वेळी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्या देखील फोडण्यात आल्या. या घटनेत दोन पोलिस जखमी झाले आहेत. नागरिकांनी रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment