जिल्ह्यातून शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर –  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा दारून पराभव झाला आहे. नगरमधून अनिल राठोड, पारनेर – नगर मतदारसंघातून विजय औटी, श्रीरामपूर मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे व संगमनेर मतदारसंघातून साहेबराव नवले पराभूत झाले आहेत.

या जिल्ह्यात भाजपने ८ तर शिवसेनेने ४ जागा लढविल्या होत्या. सेनेच्या चारही जागा पराभूत झाल्या आहेत. विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी दारून पराभव केला. तब्बल ६० हजार मताधिक्याने लंके विजयी झाले. नगर शहरात राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना तब्बल ११ हजार मताचे लिड मिळाले असून राठोड यांचा दारून पराभव केला.

श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांना पराभूत केले. विशेष म्हणजे कांबळे यापूर्वी काँग्रेसमध्ये निवडून आले होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षबदल करून धनुष्यबान हातात घेतला. जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे.

संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी सेनेचे नवखे उमेदवार साहेबराव नवले यांचा दारून पराभव केला. थोरात तब्बल ६२ हजार मताने विजयी झाले.

सेनेने जिल्ह्यात चार जागा लढविल्या असून एकाही जागांवर विजय मिळविता न आल्याने जवळपास जिल्ह्यातूनच आता सेना संपली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment