श्रीरामपुरात वेगळा प्रयोग होण्याची शक्यता आ.कांबळे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघासाठी सक्षम उमेदवाराच्या शोधासाठी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सकाळपासून शहरात वेगवेगळ्या गटाच्या स्वतंत्र बैठक घेतल्या. उमेदवाराविषयीच्या मतभिन्नतेमुळे कोणत्याही एका नावावर एकमत आले नाही. त्यामुळे श्रीरामपुरात वेगळा प्रयोग होण्याची शक्यता बळावली आहे. 

ना. विखे यांनी प्रथम ससाणे गटाची बैठक घेतली. या बैठकीला उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, नाना शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी ससाणे गटाने युती झाल्यास भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी नको असा आग्रह धरला गेला. 

त्याऐवजी भाऊसाहेब डोळस यांचे नाव पुढे केले आहे. दुसरी बैठक त्यांनी त्यांचे कट्टर समर्थक असणारे सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जि.प. सदस्य शरद नवले, रामभाऊ लिप्टे आदी उपस्थित होते. या बैठकीत उमेदवार म्हणून पंचायत समिती सदस्या कल्याणी कानडे व उपसभापती बाळासाहेब तोरणे यांचे नावे पुढे करत त्यांना उमेदवारीची मागणी केली. 

त्यानंतर आधी ससाणे, तर नंतर आदिक गटातून बाहेर बाहेर पडलेले नगरसेवक राजेश अलघ, कलीम कुरेशी, ताराचंद रणदिवे, विजय शेळके यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, सध्या आदिक यांच्याबरोबर असलेले नगरसेवक श्यामलिंग शिंदे, रवींद्र गुलाटी यांनी स्वतंत्र भेट घेतली. शेवटी ना. विखे यांनी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांचे निवासस्थानी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

यावेळी तालुकाध्यक्ष सुनील वाणी, नगरसेवक किरण लुणीया, राजेंद्र चव्हाण, नगरसेवक दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, शशीकांत कडुस्कर आदी उपस्थित होते. त्यांनी भाजपकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीची मागणी करतानाच ससाणे गटाच्या उमेदवाराला विरोध दर्शविला. प्रत्येक गटाकडून वेगवेगळे नाव पुढे करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment