कर्जत-जामखेड हा मतदारसंघ शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या एंट्रीमुळे राज्यभर गाजला. निवडणुकीपूर्वीच या भागात त्यांनी तयारी केली होती.
मागील दोन वर्षांपासून त्यांचे संपर्क अभियान जोरात होते. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या प्रा. राम शिंदे यांना पराभवाचा झटका दिला.
मत विभाजन आणि जातीय समीकरणाचा फायदा मिळत असल्याने शिंदे दोनदा विजयी झाले होते. या वेळी मात्र ही समीकरणे मोडीत काढण्यात पवारांना यश मिळाले.
सुरुवातीला झालेली बंडखोरी शमविण्यात दोन्ही बाजूला यश आल्याचे सांगितले जात होते. पण पवारांकडील नाराजी यात कमी झाली. मात्र, शिंदे यांच्याविरुद्धची नाराजी कायम होती तसेच शिंदेंना चांगला पर्याय उपलब्ध झाल्याने मतदारांनी बदल घडविला.