पराजय झटकून किरण काळे लागले कामाला

Ahmednagarlive24
Published:

कालच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. असे असले तरी काळे यांनी आजच महानगरपालिकेमध्ये दाखल होत सुरू केलेल्या कामामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

निवडणुकीमध्ये काळे यांनी जाहीर केलेला वचननामा आणि जाहीरनामा हा चांगलाच गाजला होता. काळे हे वंचित बहुजन आघाडचे उमेदवार होते. 

अल्पावधीत त्यांनी आपला प्रचार केला होता. परंतु पराभवाने खचून न जाता नगरकरांच्या सेवेत तात्काळ दाखल होत काळे यांनी आपण आगामी काळात नगरकर जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहोत हा संदेश दिल्याचे आजच्या त्यांच्या मनपा भेटीतून दिसते आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment