खळबळजनक घटना – परळी-नगर रेल्वेमार्गासाठी चार कोटींचा मुरूम चोरला

Ahmednagarlive24
Published:

बीड : बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी चक्क चोरीचा मुरूम वापरल्याची खळबळजनक बाब बुधवारी (दि.२५) समोर आली. रेल्वेमार्गाच्या कामावरील कंत्राटदार कंपनीने बिंदुसरा नदीतील सुमारे ४ कोटींचा १ लाख ब्रास मुरूम चोरून नेला. 

जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या निनावी पत्राने या चोरीच्या प्रकाराला वाचा फोडली. या पत्राआधारे जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागविला. सत्यता आढळल्यामुळे पीव्हीआर कंपनीच्या संस्थापकासह चौघांविरुद्ध ग्रामीण ठाण्यात मंगळवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला..

तालुक्यातील पाली येथे बिंदुसरा प्रकल्प आहे. सध्या दुष्काळामुळे हे नदीपात्र कोरडेठाक पडलेले होते. मागील काही दिवसांपासून बिंदुसरा नदीवरील रेल्वेपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणासह शहरातील पिंगळे बलगुजार व पालवण शिवार या तीन ठिकाणाहून रेल्वे कामाच्या ठिकाणी नदीतील रोडा उत्खनन करण्यात आले. हे सारे करताना जिल्हा खनिकर्म विभागाकडून संबंधितांनी परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले..

दरम्यान. बिंदुसराच्या पात्रातून तब्बल १ लाख ब्रास रोड्याचे उत्खनन झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी अनिल पाटील यांनी मंगळवारी बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार नोंदवली. 

त्यानुसार पीव्हीआर कंपनीचा संस्थापक पी. व्ही. रामय्या, व्यवस्थापकीय संचालक पी. श्रीधर, व्यवस्थापक मतय्या, समन्वयक पालेगर व इतरांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेली कंपनी ही परराज्यातील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment