पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्रद्ध तर्पण करण्यात येते. लोक या पंधरवडयात आपल्या दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध विधी करतात. हिंदू धर्मात त्यास विशेष महत्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षास पितृपक्ष म्हणतात.
पितरांच्या मृत्यू तिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या यादरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्यू तिथी माहित नसेल तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येला तर्पण करता येते. पितृपक्षामागे ज्योतिष कारणेसुद्धा आहेत. ज्योतिष शास्त्रात पितृदोष खूपच महत्वाचा समजला जातो. असा दोष असल्यास जातकास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अशा परिस्थितीत पितरांच्या शांतीसाठी पितृदोष विधी करावा लागतो. हिंदू शास्त्रानुसार पितृपक्षास श्राद्धकर्मा व्यतिरिक्त विशेष महत्त्व आहे. पितरांना भोजन व जल अर्पण करणे, गरीब व गरजवंतांना दान केल्याने पितर संतुष्ट होतात. या पितृपंधरवडयात पितरांसाठीच्या नैवद्यास विविध प्रकारच्या भाज्यांची आवश्यकता असल्याने सध्या बाजारात भाज्यांना चांगलीच मागणी वाढली आहे.
भोजनासाठी जे पदार्थ बनविले जातात, त्याचे तीन भाग केले जातात. एक भाग गाईला दिला जातो. दुसरा भाग कावळयांसाठी ठेवतात तर तिसरा भाग पाण्यात सोडला जातो. या काळात कावळयांना विशेष महत्त्व आहे.. गणपती उत्सवानंतर महत्वाचा कालावधी असतो तो पितृपंधरवड्याचा.
यामध्ये आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या पूर्वजांना शांती मिळावी, ते तृप्त व्हावेत, या आदरापोटी लोक श्राद्ध घालतात. या विधीनिमित्त आप्तेष्टांना भोजन देऊन तृप्त केले जाते.
मृत व्यक्तीच्या आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ घालण्याचीही पध्दत आहे. त्या त्या भागात उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळया भाज्या नैवद्यासाठी केल्या जात असल्याने सध्या भाज्यांना चांगलीच मागणी वाढली आहे
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख