अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आमदार आणि मंत्र्यांचे कार्यकर्ते अथवा मतदारसंघातील सामान्य नागरिक मुंबईमध्ये येत असतात मात्र या लोकांची राहण्याची सोय नसल्याने ते आमदारांच्या निवासातच डेरेदाखल होतात.
खोलीत एखादी जागा मिळाली तर तिथेच रात्रभर झोप काढतात. मात्र आमदाराच्या पलंगावर झोपण्याची हिंमत कोणीही करत नाही. मात्र पारनेरचे आमदार निलेश लंके यांची गोष्टच वेगळी.
आमदार लंके यांना आकाशवाणी आमदार निवासात १०९ खोली मिळाली आहे. त्या खोलीत लंके जेवण करून रात्री १२ वाजताच्या सुमारास पोहचले तर कार्यकर्त्यांची गर्दी होती. मिळेल त्या ठिकाणी कार्यकर्ते झोपले होते.
आमदारांच्या बेडवरही कार्यकर्ते झोपलेले. आमदारांनी त्या कार्यकर्त्यांना न उठवता बेडजवळ असलेल्या छोट्या जागेत सतरंजी टाकली आणि तिथेच झोपले. सकाळी कार्यकर्त्यांना आमदार खाली झोपलेले दिसले.
याबाबत लंके म्हणाले, अगोदरच कार्यकर्ते प्रवासाने थकून गेलेले असतात. आमदार निवास खेड्यापाड्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना हक्काचे ठिकाण वाटते. मुंबईला गेल्यावर आपली राहण्याची सोय होते अशी त्यांची खात्री असते.
मी खोलीत गेलो तर कार्यकर्ते झोपलेले होते. मग त्यांना झोपेतून उठवावं मला योग्य वाटलं नाही. मी जे काही केले यात मला काहीही विशेष वाटत नाही. लोकांनी आपल्याला आमदार केले आहे. आपली बांधिलकी लोकांशी आहे.
आमदार निवासावर लोंकाचा हक्क आहे. लोकांचा सन्मान आपण केला पाहिजे. मी आमदार निवास परिसरात वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांशी बोलतो. त्यांच्या अडचणी समजून घेतो आणि त्यांना मदत करतो. आपण लोकांच्यासाठी तिथं गेलो आहे याच भान मला कायम असतं.” असंही ते म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com