अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-मराठा समाज हा प्रगत समाज असल्याने त्यांना आरक्षणाची गरज नाही. १९९९ साली खत्री समितीच्या अहवालात आम्ही स्वत: आरक्षण देण्यावर ठाम राहून मराठा सामाजाला आरक्षण का देऊ नये याबाबत सांगितले.
यात मराठा सामाजाला आरक्षण मिळण्या इतके कोणतेच पुरावे उपलब्ध नसल्याने या सामाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही असे ओबीसी समाज नेते चंद्रकांत बावकर म्हणाले. रविवारी २९ नोव्हेंबर रोजी अलिबाग मध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यापुढे ते म्हणाले कि, आपला मोर्चा सौ सोनार की, आणी एक लोहार की, अस करायच ते म्हणाले. आमच्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध विधान भवनावर मोर्चा काढायचा आहे. हा मोर्चा मराठ्यांच्या ५८ मोर्च्यांना फिका पाडणारा मोर्चा ठरणार आहे असे सांगितले.
यामध्ये ३३ मागण्यांमधील निम्म्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न आम्ही येत्या वर्षात मान्य करुन घेऊ असे सांगितले. आम्ही ५२ टक्के आहोत आम्हाला ५२ टक्के आरक्षण द्या. ओबीसी सामाजाने व्यावसायाकडे वळले पाहिजे. शासकीय वसतीगृह चालू करुन विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपला लढा चालू आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलीतांचेच नव्हे तर सर्व समाजांचे आहेत. गायकवाड आयोगाने राज्य नमविण्याचे काम केले. हिंदु धर्मात चार वर्ण सांगितले जातात. यामध्ये आपल्या ओबीसींना अजून न्याय दिल्याचे दिसत नाही. नोकरीत काम करत आसलेले ओबीसी समाजातील उच्च पदावरील लोक आता म्हणायला लागली की, आम्ही पण ओबीसी आहोत.
आज या ठिकाणी आगरी, कुणबी, परीट, नाभिक, सुतार, भंडारी, कोळी समाज एकत्र आलो त्यामुळे याच्यानंतर आमची जात ओबीसी मानली पाहिजे. यावेळी ओबिसी नेते चंद्रकांत बावकर, जे.डी.तांडेल , जिल्हा ओबीसी समन्वयक उदय कठे, अड. गोपाळ शिर्के ,
मधुकर पाटील, शंकरराव म्हसकर, सुरेश मगर,सुरेश महाबळे, महाराष्ट्र परिट समाज उपाध्यक्ष प्रकाश पवार, परीट समाज जिल्हाध्यक्ष नंदकिशोर राक्षे, रामचंद्र म्हात्रे, समीर शिर्के, यशवंत शिंदे, सतिश भगत, अनंत थिटे, महेश बामुगडे, अमोल पेणकर, समीर शिर्के व सर्वच ओबीसी समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved