अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- देशात सध्या पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’ची एकही घटना आढळून आलेली नाही. सध्या राज्यात बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही.
त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले, महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात बर्ड फ्ल्यूची एकही घटना नोंदवण्यात आली नाही. देशांत मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यूमुळे काही कावळे मरून पडल्याची घटना नोंद झाली आहे.
तर केरळमध्ये काही पोल्ट्रीमध्ये पक्षी या आजराने मरण पावले आहेत. केरळच्या कोझिकोड येथील दोन पोल्ट्री फार्मध्ये ‘बर्ल्ड फ्लू’ पसरल्याचं समोर आलं आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूचा कहर वाढल्यानं हायअलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’ला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
‘बर्ड फ्लू’ची फैलाव माणसांमध्येही होण्याची दाट शक्यता असते. याआधी 2006 साली महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाला होता. त्यावेळी हजारो कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ची लागण झाली होती.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved