अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- २०२० या वर्षात सर्वांच्या तोंडात एकच शब्द होता तो म्हणजे कोरोना, याच आजाराच्या साथीमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात मात्र, सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दांमध्ये कोरोना नाही.
तर पॅनडेमिक हा शद्ब शोधला गेला आहे. एका सर्वेक्षणानुसार यंदा हा शब्द इतर कोणत्याही शब्दांपेक्षा सर्वाधिक वेळा ऑनलाईन डिक्शनरीवर शोधला गेला आहे.

या वर्षभरात हा शब्द असंख्य वेळा शोधला गेल्याने या शब्दाने एक विक्रमच नोंदवला असल्याचे मरियम वेब्स्टर डिक्शनरीकडून सांगण्यात आले.
मरियम वेब्स्टर डिक्शनरीनुसार, पॅनडेमिक या शब्दाचा अर्थ एखाद्या आजाराचा अनेक देशांमध्ये एकाचवेळी प्रसार होणं आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फटका बसणं असा आहे.
या शब्दाचे मूळ ग्रीक शब्द पॅन म्हणजे सर्वत्र आणि डेमोज म्हणजे लोक यात आहे, असंही मरियम वेब्स्टर डिक्शनरीनं स्पष्ट केलं आहे.
११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड १९ ही जागतिक साथ असल्याचे जाहीर केल्यानंतर हा शब्द प्रचंड वेगाने शोधला गेला. मार्चपासून जगभरात सर्वत्र पॅनडेमिक हा शब्द सर्वत्र बोलला, ऐकला जाऊ लागला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com













