अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोविड नियंत्रण उपाययोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. पुन्हा लॉकडाउन न करता कडक निर्बंध आणणार आहे.
राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. कॉन्टॅक्ट ट्रेंस करणे हे राज्य सरकार पुढे आव्हान आहे. कुठेही बेड कमी नाहीत. खाजगी ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये अडचण असेल.
राज्यात 85 टक्के ए सिमटोमॅटिक रुग्ण आहेत. रोज 3 लाख लसीकरणाचे लक्ष आहे. लसीकरणासाठी 100 बेड च्या रुग्णालयाची अट शिथिल करून 50 किंवा 25 करावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असंही टोपे यांनी सांगितले. ‘माझ्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांना आवाहन आहे की मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात भाऊगर्दी करू नये.
अति महत्वाचं काम असेल तरच या, असं आवाहनही टोपे यांनी केलं. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. औरंगाबाद, नागपूर अमरावतीसह काही शहरांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का अशी चर्चा सुरू आहे. पण, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजनावर चर्चा सुरू आहे, कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्यात. अमित शहा यांनी ही वाढत्या कोरोना केस संदर्भात सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार म्हणून आम्ही त्या सूचनांचे पालन करत आहोत, असंही टोपे म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|