अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाळू तस्करांकडून अवैधरित्या वाळूउपास करणे अशा गोष्टी सुरु असताना जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यात तालुक्यातील उंबरी शिवारातील टेकडी फोडून अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार अमोल निकम यांनी शरद बाळासाहेब ब्राह्मणे (रा.उंबरी बाळापूर) यांना तब्बल 22 लाख 75 हजार 300 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, उंबरी येथील टेकडीवर उत्खनन करुन शरद ब्राह्मणे यांनी रोज सुमारे 30 ते 40 ट्रॅक्टर ट्रॉली मुरुमाची विक्री केली.
याबाबत सरपंच, ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीचे नेते सरुनाथ उंबरकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून तक्रार केली होती. यामध्ये म्हंटले होते की, महसूल विभागातील कर्मचारी-अधिकारी वाहतूक होताना वाहन पकडत.
परंतु काहीवेळाने सोडून देत. यामुळे कारवाईबाबत शंका उत्पन्न होत असून सात दिवसांच्या आत पंचनामा करुन दंडात्मक कारवाई करावी.
जर याप्रकरणी कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. अखेर तहसीलदार निकम यांनी तातडीने दखल घेत हि कारवाई केली आहे.
दरम्यान उंबरी बाळापूरचे कामगार तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यातून तब्बल 220 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन व विक्री केल्याचे समोर आले.
त्यानुसार तहसीलदारांनी शरद ब्राह्मणे यांना 22 लाख 75 हजार 300 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. तसेच सात दिवसांच्या आत उत्तर देण्यासही सांगितले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved