बांधकाम कामगारांना विदेशात मिळेल 2 लाख रुपये पगार! वाचा राज्य सरकारने काय केली घोषणा?

Ajay Patil
Published:

भारतामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक काम करत असतात. अशा असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आर्थिक लाभाच्या योजना चालवल्या जातात.

अशा कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती व्हावी व त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तर सुधारणे हा त्या मागचा उद्देश असतो. असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांचा विचार केला तर यामध्ये बांधकाम कामगार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत.

म्हणजेच एकंदरीतपणे बांधकाम कामगारांची संख्या यामध्ये खूप मोठी आहे. याच बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची अपडेट असून त्यांना आता थेट विदेशात काम करण्याची किंवा नोकरीची संधी चालून आली असून यामध्ये त्यांना तब्बल एक लाख 40 हजारापासून ते दोन लाख रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. नेमकी ही संधी कशी आहे? याबद्दलची माहिती घेऊ.

 बांधकाम कामगारांना विदेशात काम करण्याची संधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आता विदेशामध्ये नोकरीचे संधी चालून आली असून यामध्ये कामगारांना प्रति महिना 1 लाख 40 हजार ते दोन लाख रुपयापर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे व ही संधी इस्रायल या देशांमध्ये असून विशेष म्हणजे यासाठी बांधकाम कामगारांना शासनाच्या माध्यमातून पूर्ण मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.

याकरिता जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे मंत्रि मंगलप्रभात लोढा यांच्याकडून बांधकाम कामगारांना याबाबत आवाहन देखील करण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शटरिंग कारपेंटर, फ्रेमवर्क, बार बेंडिंग मेसन, सिरॅमिक टाइलिंग मेसन आणि प्लास्टरिंग मेसन या ट्रेड करता अर्ज करणे गरजेचे आहे.

 यासाठी कुठल्या पात्रता आवश्यक आहेत?

यासाठी प्रत्येक कामगाराला महिन्याला एक लाख 40 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार असून या नोकरी करिता 25 ते 45 वर्षे वयोगटातील कामगारांना अर्ज करता येणार आहे. असेच कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

एवढेच नाहीतर काम करायला कमीत कमी एक वर्ष व जास्तीत जास्त पाच वर्षाच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर सही करणे आवश्यक राहील. तसेच कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असून सगळ्यात महत्वाचे म्हणजे संबंधित उमेदवाराने इस्रायलमध्ये अगोदर काम केलेले नसावे. एवढेच नाही तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्रायल मध्ये काम केलेले नसावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe