अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तब्बल गेल्या ३ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हैदराबादमधून बाळ बोठेला अटक केली आहे.

रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर 2020 रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात खून झाला होता. या खुनाच्या कटकारस्थानात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या खुनाची सुपारी बाळ बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
काही दिवसात पोलिसांनी भिंगारदिवेला अटक केली होती. मात्र, बोठे फरार झाला होता. फरार होताना बोठेनं दोन्ही मोबाईल घरीच ठेवले होते. पोलिसांनी हे मोबाईल जप्त केले.
तसंच बोठेच्या शोधासाठी विविध ठिकाणी ५ पोलीस पथकं रवाना करण्यात आली होती. अखेर हैदराबादमधून पोलिसांनी बोठेला अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. मात्र, रेखा जरे यांचा खून का करण्यात आला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र आता बोठेच्या अटकेनंतर पोलीस तपासात या हत्येमागील खरं कारण समोर येणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|