आता ‘या’ पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये झाला समावेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :कोपरगाव तालुक्याचा मका पीक विमा योजनेत समावेश नसल्यामुळे मका पिकाचे नुकसान होऊन मका उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित रहात होते.

त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता.

त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये समावेश झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या विमा कंपनीमार्फत पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

यामध्ये कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, बाजरी, कपाशी आदी पिकांचा सामावेश होता. मात्र, मका पिकाचा समावेश नव्हता.

पीक विमा काढला असल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर पिकांचे अवकाळी पाऊस, महापूर, रोगकिडीमुळे नुकसान झाल्यास सरकारी नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळते.

मात्र, कोपरगाव तालुक्यासाठी या योजनेत मका पिकाचा समावेश नसल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात मका पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते.

परंतु मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. एकीकडे मका पिकावर लष्करी अळींचा हल्ला,

तर दुसरीकडे मका पिकाला विमा कवच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले होते. याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये मका पिकाचा समावेश व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले होते.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये समावेश करून मका पिकाला विम्याचे कवचकुंडले देऊन मका उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता मिटवल्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, कपाशी आदी पिकांबरोबरच मका पिकाचा देखील विमा काढून होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment