अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातंर्गत 2018 पासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बातचित केली.
त्यावेळी ते बोलतं होते. त्यावेळी ते म्हणाले की, मुख्य सचिव या सगळ्यांसंदर्भात माहिती घेणार आहेत. तसेच कुणी जाणूनबुजून केले आहे का? याचा तपास देखील करणार आहे. एमपीएससी संदर्भात आम्ही योग्य मार्ग काढू,
असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याच्या मुद्यावरून सध्या मंत्रिमंडळ बैठकीत संतापाचा सूर यला मिळत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री भडकले असल्याची माहिती आहे. सरकारला अडचणीत आणणार्या अधिकार्यांविरुद्ध मंत्रिमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved