मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून अद्यापही एकमत झाले नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथविधी झालेल्या सहा मंत्र्यांकडे खात्यांचा तात्पुरता कार्यभार सोपवून सरकारचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका असली तरी शिवसेना आणि काँग्रेस मात्र अधिवेशनापूर्वीच विस्तार करण्यासाठी आग्रही आहेत.
अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील शपथग्रहण केली आहे.
आज पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळ यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले, यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.