अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या केडगाव येथील भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलीत ओअॅसिस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता 10 वीच्या पहिल्या बॅचचा निकाल 100 टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेच्या गुणवत्ता यादित प्रथम- कृष्णा बिहाणी (96.6 टक्के), द्वितीय- जान्हवी यादव (96.2 टक्के), तृतीय- दिव्या चिताळ (94 टक्के) हिने येण्याचा बहुमान पटकाविला.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्या शोभा भालसिंग, वर्गशिक्षक पांडुरंग गवळी, शिक्षक शरद पवार, कासिफ खान, गौतम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे विद्यालयाच्या संचालिका वैशाली कोतकर व भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे यांनी अभिनंदन केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews