अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
राज्यात पोलिसांसाठी घरं कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल,
तर त्याला त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरं महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे,
असे अनिल देशमुख म्हणाले. कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घर बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved