कर्जबाजारीपणाला कंटाळून कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर  ;- कर्जबाजारीपणाला कंटाळून टाकळी हाजी येथील शेतकरी एकनाथ हरिभाऊ शेटे (वय ५५) यांनी कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शेटे यांची बागायती शेती असून डाळिंब व कांद्याचे उत्पादन ते घेत. गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे त्यांच्या डाळिंब बागेचा बहर गळून गेला.

त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गेल्या वर्षी कांद्याला भाव मिळाला नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते. बँकेने नोटिसा पाठवल्यामुळे ते चिंताग्रस्त होते, असे नातेवाईकांनी सांगितले.

गेल्या सहा महिन्यांत पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बागायती तालुक्यातही आत्महत्येचे लोण पसरत चालले आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment