ह्या बाजार समितीतही कांद्याचा भाव वधारला

Published on -

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढत आहेत.

पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाल्यानंतर आज सोमवारी राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाला आहे.

निर्यातबंदीतही कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांत समाधान व्यक्त होत आहे. देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यास बंदी घातली आहे.

यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून विरोधी पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचा कांदा खराब झाला असून

बाजार समितीत कांदा आवक कमी झाली आहे. यामुळे कांद्याला चांगला भाव मिळत आहे. आज सोमवारी राहाता बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात नंबर 1 च्या कांद्याला 3800 ते 5100 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात नंबर 2 च्या कांद्याला 2500 ते 3750 रुपये, नंबर 3 च्या कांद्याला 1000 ते 2450 रुपये, गोल्टी कांद्याला 2500 ते 2700 रुपये तर जोड कांद्याला 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल असे बाजार भाव मिळाले आहेत.

एकंदरीत आता बाजार समितीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत असल्याचे नगर जिल्ह्यात पहायला मिळत आहे. यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe