कांदा पोहोचला ८००० रुपयांवर !

Published on -

नाशिक :- गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत माेठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभावाने उच्चांकाचे नवीन रेकाॅर्ड केले असून उन्हाळकांंद्याला देवळा बाजार समितीत आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे.

आशिया खंडातील सर्वात माेठी बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी (दि. २१) केवळ ४०० क्विंटल कांदा आवक झाली. त्यामुळे बाजारभावाने सात हजार रुपयांचा टप्पा ओलांडला.
शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांदा आता संपुष्टात येऊ लागला आहे. उन्हाळ कांदा दोन – तीन आठवडे पुरेल असा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचेही नुकसान झाले आहे.

अहमदनगर : अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या लिलावात शेतकर्‍यांच्या एक नंबर कांद्याला 7000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. बाजार समितीमध्ये काल 161 कांदा गोण्यांची आवक झाली.

एक नंबर कांद्याला सरासरी 6001 रुपये ते 7000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले. दोेन नंबर कांद्याला 5001 ते 6000 रुपये, तीन नंबर कांद्याला 3001 ते 4000 रुपये, गोलटी कांद्याला 3000 ते 4500 रुपये या प्रमाणे बाजारभाव मिळाले आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!