तरच मराठा समाजाला आरक्षण द्यावे; संभाजी राजे म्हणाले …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

पण, EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही अशी ग्वाही द्यावी अशी मागणी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मांडली आहे. EWS घेतल्याने SEBS ला धोका निर्माण होवू शकतो अशी भिताही संभाजी राजेंनी व्यक्त केलेय.

EWS आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे ते फक्त मराठा समाजासाठी नाही, असं म्हणत त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत न्यायालयाकडून चांगला निर्णय अपेक्षित असल्याचं म्हटले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या OBC समाजात संभ्रम असून एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणीही संभाजी राजेंनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe